डोळे मिटुन प्रेम करते,
ती प्रियासी..
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते,
ती मैत्रिण..
डोळे वटारुण प्रेम करते,
ती पत्नी.. आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते,
ती फक्त
........आई.....
गुरुवार, 6 दिसंबर 2012
बुधवार, 8 फ़रवरी 2012
घटस्फोट
त्यांच्या सुखी संसारात
नेहमी आनंद खेलायचा
भांडन करायला दोघाना
वेळ कधीच नाही मिलायचा
भावी सुखी संसारासाठी तो
कर्तुत्वाला वेळ देऊ लागला
आणि कामासाठी बराच वेळा
बाहेरगावी राहू लागला
पण त्यामुले ......
त्यामुले तिच्या मनातसंशयाचा बिज रुजू लागल
तिच्या मनातील ओल प्रेम
मग आतल्या आत कुजू लागल
असाच एकदा परतल्यावर
जेव्हा तो घरी राहिला होता
तिच्या प्रत्येक नजरेत त्याने
संशयच भरलेला पाहिला होता
त्याला समजताच नव्हत की
अस का घडत होत?
तो तर बनवायला निघाला होता
पण सर्व कही बिघडत होत
आणि शेवटी त्याच्या आयुष्यात
एक दिवस असा आला
समजावून पाहिल तिला किती
मग तो ही हतबल जाला
फक्त एकाच शब्द बोलून
तिने बंद केले आपले ओठ
धक्काच बसला त्याला एकून
तो शब्द
घटस्फोट , घटस्फोट , घटस्फोट
आज किती दिवसांनी वाटलं
आज किती दिवसांनी वाटलं कि तू माझी नाही...
आज किती दिवसांनी वाटलं कि तू माझी नाही...
वेड का तू लावलेस मला इतके सांगशील काकाही...
उगाच मनाचे दार मी उघडले तुझ्यासाठी,
आता ते फक्त तुझीच जणू वाट पाही...
का ह्या निष्ठुर देहाला तू परत पाझर फोडलास गं,
होतो ना मी एकटा, का हा धागा तू तोडलासगं.
आता सांग कसं जगायचं ते,
कसं तुझ्याविना मरायचं ते......
विझता विझत नाही आहे आग माझ्या मनातली,
अवस्था कशी माझी ही एका क्षणातली....
(¯`v´¯)
.`•.¸.•´ ★
¸.•´.•´¨) ¸.•¨)
(¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ♥ ♥~~
मैञीण
नाही तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल
आता तुझं ते भेटणं नाही
दिलखुलास तुझं ते हसणं नाही
निरागस,नितळ वागणं तुझं मनात घर करुन गेलं
अन तुझं बोलणं कितीतरी आठवणी पेरुन गेलं
हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप...हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता
आठवतो तुला मी अधुन मधुन त्याचा राग नको मानुस
फ़क्त तुझ्या आठवणी आहेत..त्या तू परत नको मागुस
जगाला हसवत स्वत:चे अश्रू पिणारी तू
अळवावरच्या दवालाही तळहातावर घेणारी तू
तू माझं 'श्रद्धा'स्थान अन तुझी मैत्रि माझी 'श्रद्धा' होती
मी निवडुंग...पाहुन तुला...क्षणभर जगलो तू असं रानफ़ुल होती
आठवण तुझी आजही हळव्या मनास आहे...मग सांग मी कठोर कसा ठरलो
अगं...हे नखरे जीवनाचे, मैत्रित कधि मी न मागे सरलो
पुढच्या जन्मातही पुन्हा तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल
हा जन्म अपुरा पडला पुढच्या जन्मी पुन्हा तुझा मित्र होऊन जगेल.
तुम न बुलाओ मैं आ जाऊँगी,
तुम न बुलाओ मैं आ जाऊँगी,
न भाड़ा न किराया दूँगी,
घर के हर कमरे में रहूँगी,
पकड़ न मुझको तुम पाओगे,
मेरे बिन तुम न रह पाओगे,
बताओ मैं कौन हूँ?
उत्तर : हवा
न भाड़ा न किराया दूँगी,
घर के हर कमरे में रहूँगी,
पकड़ न मुझको तुम पाओगे,
मेरे बिन तुम न रह पाओगे,
बताओ मैं कौन हूँ?
उत्तर : हवा
मंगलवार, 7 फ़रवरी 2012
वेल व झाड
एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेडलागल
वेलीला विचारू तरी कस?
या प्रश्नाने त्याला पछाडल,पण,
आपण जरा धीर धरावा अस म्हणतत्याने
स्वत:ला सावरल, वेल मात्र आपली हसत,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,
काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर पसरू
लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली , वेल
म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का???
ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,
हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले , विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे
वचन दिले,
वचन देताच वेळ मात्र झाडालाबिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच
ओघळली ,
आसवे पुसत पुसत त्याने तिलाआधार दिला, कारन .... तिला आधार देण
हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला...
आठवणीतील गाव
आठवणीतील गाव ...,,,...
खूप दिवस झाले ...
माझ गाव माझ्या आठवणीत आले ...
पहाटेची कोबडाची कुकू कु ...
... कानात क्षणभर भास करून गेल ..
आठवणीचे क्षण मग ते शेतातील असो ...
पायवाटेतील असो ,बैलगाडीतील असो ...
नदीनाल्यातील असो ,जंगलातील असो ...
किवा माझा अंगणातील असो ...
बालपणीतील बाल कडू बनून गेलेत ...
नाही येणार ते दिवस ...
नाही येणार ते क्षण ...
नाही येणार ते बालपण ..
नाही येणार माझ गावच गाव ....
पुन्हा एकदा खंत आहे त्या अविस्मणीय क्षणाची ...
पुन्हा एकदा खंत आहे त्या प्रेमळ लोकांची ...
पुन्हा एकदा खंत आहे माझा त्या गावच्या पंरपरेची ...
गेले ते दिवस राहिला फक्त त्या आठवणी...
ज्या फक्त सोनेरी क्षणाची एक आठवणीच पान बनून राहिल्यात !!!
खूप दिवस झाले ...
माझ गाव माझ्या आठवणीत आले ...
पहाटेची कोबडाची कुकू कु ...
... कानात क्षणभर भास करून गेल ..
आठवणीचे क्षण मग ते शेतातील असो ...
पायवाटेतील असो ,बैलगाडीतील असो ...
नदीनाल्यातील असो ,जंगलातील असो ...
किवा माझा अंगणातील असो ...
बालपणीतील बाल कडू बनून गेलेत ...
नाही येणार ते दिवस ...
नाही येणार ते क्षण ...
नाही येणार ते बालपण ..
नाही येणार माझ गावच गाव ....
पुन्हा एकदा खंत आहे त्या अविस्मणीय क्षणाची ...
पुन्हा एकदा खंत आहे त्या प्रेमळ लोकांची ...
पुन्हा एकदा खंत आहे माझा त्या गावच्या पंरपरेची ...
गेले ते दिवस राहिला फक्त त्या आठवणी...
ज्या फक्त सोनेरी क्षणाची एक आठवणीच पान बनून राहिल्यात !!!
सदस्यता लें
संदेश (Atom)