शुक्रवार, 26 दिसंबर 2014

Demat account information in marathi

DEMAT अकौंट उघडण्यासाठी खालीं दिल्याप्रमाणे कागदपत्रे,फोटो आणी माहिती द्यावी लागते तसेच DEMAT अकौंट उघडण्यासाठी DP (DEPOSITORY  PARTICIPANTS ) काही चार्जेस  लावीत असतील तर तेही भरावे लागतात तसेच आवश्यक तेव्हढा STAMP पेपरही विकत घ्यावा लागतो
आपण राहत असलेल्या पत्त्याची पुष्टी करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे पुरावा म्हणून चालतात
  • पासपोर्ट
  • रेशनकार्ड
  • मतदाता प्रमाणपत्र(VOTERS  IDENTITY कार्ड)
  • DRIVING परवाना (LICENSE )
  • जेष्ठ नागरिक कार्ड
  • विद्यापीठाला सलंग्न असलेल्या  कॉलेजने जरी केलेले ओळखपत्र
  • LANDLINE टेलीफोन, इलेक्ट्रिसिटी , तसेच GAS ची  पैसे भरलेली पावती
  • आयकर विवरण
  • REGISTAR केलेला भाडेकरार किंवा खरेदी विक्री करार
  • राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाने दिलेले ओळखपत्र
  • LATEST बँक अकौंट विवरण किंवा पासबुक
IDENTITY पुरावा म्हणून पुढील सगळी कागदपत्र चालतात
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • मतदाता कार्ड
  • DRIVING LICENSE
  • फोटो   क्रेडीट कार्ड
  • कोणत्याही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जारी  केलेले ओळखपत्र
  • विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या माविद्यालयाने जारी  केलेले ओळखपत्र
वरील सर्व कागदपत्रे सेल्फ-ATTESTED असली पाहिजेत .VERIFICATION साठी मूळ कागदपत्रे सोबत न्यावीत अथवा खालील उल्लेख केलेल्या  AUTHORITIES कडून सत्यापीत करून घ्यावीत .
  • नोटरी
  • GAZZETED  ऑफिसर
  • कोणत्याही बँकेचा शाखाव्यवस्थापक
  • COURT  MAGISTRATE न्यायाधीश
  • आमदार खासदार नगरसेवक
  • SPECIAL  EXECUTIVE  MAGISTRATE
खालच्या यादीत दिलेले बँक अकौंट डीटेल्स  पण द्यावे लागतात
  • बँकेचे नाव
  • बँकेच्या शाखेचे नाव  आणी पिन  कोडसह  पूर्ण पत्ता
  • खात्याचा प्रकार बचत, चालू  अथवा कोणत्याही अन्य प्रकारचे खाते
  • बँकेच्या खात्याचा  संपूर्ण  नंबर
  • बँकेच्या शाखेचा MICR तसेच IFSC  कोड नंबर  हे दोन्ही कोड नंबर   बँकेच्या चेकबुकवर किंवा पासबुक वर दिलेले  असतात
या माहितीच्या पुराव्यासाठी CANCELLED चेकची ‘X’ROX , बँक स्टेटमेंटची ‘X’ROX ,बँक पासबुकची ‘X’ROX किंवा बँकेच्या शाखाव्यवस्थापकाचं  पत्र दिलेलं चालतं.
DEMAT  अकौंट उघडण्यासाठी PAN  कार्ड असणे अत्यावश्यक आहे . DEMAT अकौंट एका व्यक्तीच्या नावावर (SOLE  HOLDERS NAME), किंवा दोन किंवा तीन व्यक्तींच्या नावाने संयुक्त (JOINT ) अकौंट उघडू शकतो .जास्तीत जास्त तीन नावावरच DEMAT अकौंट उघडता येतो. या सर्वांचे ADDRESSचा पुरावा , IDENTITYचा पुरावा तसेच बँक अकौंट डीटेल्स तसेच फोटो द्यावी लागतात . सर्व संयुक्त खातेधारकांचे PAN कार्ड असण जरुरीचं आहे.
DEMAT  अकौंट १८वर्षाखालील  व्यक्ती स्वताच्या एकट्याच्या नावावरच  उघडू शकते  . १८  वर्षाखालील व्यक्तीचा अकौंट उघडताना त्याच्या पहिल्या पालकाचा फोटो त्याच्या स्वताच्या फोटोबरोबर देणे आवश्यक आहे  प्रत्येक १८वर्षाखालील व्यक्तीच्या जन्मतारखेचा पुरावा सेल्फ ATTESTED  द्यावा लागतो .  प्रत्येक  खातेधारकाचा फोटो खाते उघडण्याच्या फार्मवर  चिकटवून त्यावर ACROSS सही करावी लागते. संयुक्त खात्यामध्ये ज्या क्रमाने नावं असतील त्याचक्रमाने TRADING अकौंटमध्ये संयुक्त नावं असली पाहिजेत. आपण  DEMAT  अकौंटमध्ये  सही इंग्लिश ,हिंदी किंवा भारतीय घटनेतील ८व्या SCHEDULE मधील कोणत्याही भाषेत करू शकतो . या व्यतिरिक्त कोणत्याही भाषेत सही  करावयाची असेल किंवा खातेधारकाला THUMB  IMPRESSION (अंगठा ) द्यावयाचा असेल तर MAGISTRATE किंवा SPECIAL EXECUTIVE MAGISTRATE ने  त्यांच्या सही शिक्क्यानिशी ती सही किंवा अंगठा ATTEST करावा लागतो . सही शक्यतो काळ्या शाईत करावी. संयुक्त खात्याच्या अकौंट उघडण्याच्या फार्मवर जीथे जीथे सह्या आवश्यक असतील तीथे सर्व संयुक्त  खातेधारकांनी सह्या कराव्यात.
जर तुम्हाला इ-मेल  द्वारे खात्याचे  विवरण , केलेल्या व्यवहाराची बिले इत्यादी पाठवावयाची असल्यास इ-मेल  अड्रेस  आणी ID देणे जरुरीचे आहे . एकदा इ -मेलचे ऑप्शन निवडले तर सर्व माहिती आपल्याला इ मेल वरून पाठविली जाईल व ती आपल्यावर बंधनकारक असेल . त्यामुळे आपण आपली इं-मेल   रोज चेक केली पाहिजे. आपल्या इ – मेलच्या पासवर्डविषयी  योग्य ती गुप्तता पाळावी आणी नियमितपणे तो बदलत जावा.
DEMAT अकौंटमध्ये NOMINATION करण्याची सोय आहे. DEMAT  अकौंट उघडण्यासाठी एका व्यक्तीची ओळख लागते . ती व्यक्ती
  • सबब्रोकर
  • खातेधारक (ट्रेडिंग अकौंट , किंवा DEMAT अकौंट असलेला
  • DP चा कर्मचारी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें