रविवार, 7 अगस्त 2011

shri

थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुध्दा निघुन जातात. पण त्यांच्या नकळत काही मोरपिसे जमिनिवर तशीच पडुन राहतात. आयुष्यात काही माणसे काही क्षणच येऊन जातात पण स्वप्नाच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेऊन जातात.

प्रेम

केव्हा समजावं प्रेम झालय.......
एवढ मोठ आकाश जेव्हा छोट वाटत,
समुद्रातील पाणी सार हातात मावत,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
श्वास घेण्यासाठी तो थांबून राहतो,
ती येणार नसेल तरीही तिचीच वाट पाहतो,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
शब्दांनी सांगायचे ते डोळ्यांनी सांगतो,
डोळ्यांनी पहायचे मनाने पाहतो,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
थंडीत जेव्हा पाऊस पडतो,
अन उन्हाळ्यात आपण कुडकुडतो,
असं जेव्हा वाटू लागत..............
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
केव्हा समजावं प्रेम झालय,
असा जेव्हा प्रश्न पडेल, मन पाखरा सारख उडेल,
तेव्हाच समजावं कि खर प्रेम झालय...........

जिवन

जीवन सुंदर असतं तसंच कुरूप ही असतं
आपल्याला कुठलं हवंय ते जपायचं असतं.
माणूस छान असतं तसं वाईट ही असतं
कारण माणूस शेवटी माणूस असतं
बागेत फुलं असतांत तसे काटे ही असतात
काट्यांना चुकवून, फुलांना हुंगायचं असतं
जीवनांत यश असतं तसंच अपयश ही असतं
यशानं हुरळायचं नसतं, अपयशानं खचायचं नसतं
जगांत मित्र असतांत तसेच शत्रूही असतात
त्यांतच आपल्याला जगायचं असतं
उजवं असतं तसंच डावं ही असतं
त्यात वावगं असं काहींच नसतं
जग हे असं आहे, अन् असंच असतं
आपल्यालाच मार्ग काढून पुढे जायचं असतं!!